वारणा ज्ञानपीठ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत......

Wednesday, 20 December 2017

भविष्य अंधारात माझं....



भविष्य अंधारात माझं.................
 भविष्य अंधारात माझं,नोकरी असून उजाड झालंय....
सांगा साहेब आता तरी,आमच्या पेन्शनचं काय झालंय?......


तुमच्या सारखं भविष्य साहेब, आम्हाला बी द्या.......
आमचं दुखणं तुम्हा कळणार नाही....
रंडक पणाचं दिस, तुमचं कुणी भोगणार नाही.......
आमच्या संगट पोराचं, जगणं आता ताप झालंय.....
सांगा साहेब आता तरी,आमच्या पेन्शनचं काय झालंय.....?....


सामान्य घरातली पोरं आम्ही अर्धे मजूर अन हाडाचे गुरुजी...
समान काम असूनबी आम्हा का देता तुम्ही मजुरी.....
हाल पाहवत नाहीत वहिणींचे
अन काळवंडलेल्या पोरीचे......
साहेब आम्हालाबी द्या की पेंशन,
आमची कामं नाहीत चोरीचे...
खरंच साहेब आमचं जगणं, स्मशानाहुन घाण झालंय.....
सांगा साहेब आता तरी,आमच्या पेन्शनचं काय झालंय?......

१ नोव्हेंबर नंतर लागलो यात आम्ही काय पाप केलं,
शेती विकून डी.एड.केलं याचं काय माप झालं,
माय-बापाच्या सपना पुढी त्या टी.ई.टी.ला बी फिकं केलं...
मेल्यावर काय सांगू बापाला,
याचं सारं मोजमाप केलंय...
सांगा साहेब आता तरी, आमच्या पेन्शनचं काय झालंय ?......


गुणवत्तेला आम्हीच तर पाणी घालून मोठं केलं,
गळती असो की तंत्रज्ञान याला आम्ही छोटं केलं,
परजिल्ह्याच्या नोकरीनं आयुष्य बी थोटं केलं,
म्हातारपण कसं जाणार आमचं
तेबी वॉन्टेड मोस्ट झालंय,
सांगा साहेब आता तरी, आमच्या पेन्शनचं काय झालंय?......

संघर्ष करायला लावू नका नैतिक विचारांनी हैराण केलं,
कमी शिकलेलं कुंपणचं शेतं सारं खाऊन गेलं,
देऊन टाका की पेन्शन साहेब, तुमचं कुठं घोडं मेलं,
भविष्याच्या या  निर्वाहानं कपातीचं बी वांदं झालंय...
सांगा साहेब आता तरी,आमच्या पेन्शनचं काय झालंय?......

आमची आंदोलनं,मोर्च्रे तुम्हाला मेल्या मड्या समान झालंय,
संघटनां पाठीशी असताना हि,जगणं आमचं महाग झालंय,
उद्याचा भारत घडवतोय आम्ही साहेब,
आमचं जगणं एक कर्ज झालंय....
सांगा साहेब आता तरी,आमच्या पेन्शनचं काय झालंय?......

श्री.सूर्यवंशी जी.बी.   वाडा(पालघर)
मो-९६०४१८१८८२

Saturday, 9 December 2017

स्लॅमबुक .........भाग २-३

स्लॅमबुक .........भाग २-३
काय मिळणार आहे ?
चांगल्या मार्क पडल्या शिवाय काय मजा नाही?
नाही तर अलीकडे मुलींना बारावीला चांगले मार्क नाही पडले तर लग्न लावून देण्याच्या मानसिकते पूर्वी...........
आमच्या कडं दोन हजार पाच दरम्यान पोराला बारावीला मार्क कमी पडले तर म्हशी करून देण्याचं बेकार फॅड होतं. थोडक्यात डायरेक्ट शेण भरायचं काम.?
आणि अश्यातच हे पोरांना सारखं सांगत असल्यामुळे.......
पोरांनी पण माझी हौसचं भागवली.......
पाच -सात प्रियजनांनी-जणींनी लिहिलेली माझी स्लॅमबुक वही पोरांनी कुठं कधी फेकली मलाच कळलं नाही.आणि मुलींना पुन्हा आटोग्राफ मागणं शक्य नव्हतं कारण परीक्षा चार दिवसावर आली होती.त्यामुळे जोशी सोबतच्या विचारामुळे मी पण मुलींना वेळ काढा ?
असं म्हणून स्वाभिमान घाण टाकला नाही?

झालं सर्व जण परीक्षेच्या आदल्या दिवशी सायंकाळी देवीच्या पाया पडण्यासाठी व पेनं, पॅड ,पट्टी घेण्यासाठी बाहेर पडले.त्याठिकाणी परीक्षेला शुभेच्या ,इंग्रजीच्या ट्युशनला सरावात चांगले मार्क पडलेल्या पोरी-पोरांना त्यादिवशी भाव यायला लागला.

त्यात पोरा-पोरींचे उत्तरं अशी होती........
....अरे बाबा मलाच लिहायला वेळ पुरत नाही ,तुला कधी सांगू?
.....पाहूया वेळ भेटला तर.....?
.......सरांची हालचाल पाहून खुणा करून देईन.......?
......काळजी करू नको मी हाय?


अश्या आश्वासनांची देवीच्या मंदिरातील सभेची समाप्ती झाली. तरी राम्या,मामु,पम्या यांची मानसिकता अभ्यासाची नव्हती.
काय बघितलं आमच्या मांणसायनी आमच्यात???
हा दोघे एकाच कॉलेजला ded
करणार बघत रहा?
प्रॅक्टिकल आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या आधारे मी कसा ऐंशीचा आकडा गाठणार ही संध्याकाळी चर्चा झाली.आणि व्ही.आय.पी. प्रश्न वाचण्यात रात्रीचे दोन वाजले..
रात्री पॅड,पट्टी,जुळवा जुळवाजुळव करून पॅडवर हॉलतिकीट लावून जो तो....

उद्या सकाळी अंघोळ केलो की निघालो बघ भावा.....?
असं म्हणून सगळं खूप नियोजित झाल्याची खात्री करू लागला.....


रात्री झोपल्या नंतर पहाटे रात्री लवकर झोपलेली पोरं उठवायला आली आणि म्हणाली......
उठारय आम्ही जातोय परीक्षेला
तुम्ही या पुन्हा मागून......
दुसऱ्या सेकंदाला तर जाग आली आणि बघतो तर काय पोरं आंघोळीला पाणी आणाय बकेट घेऊन निघाले होते....
त्यांची पोझिशन पाहून
"" तुमच्या मायला लबाड तोंडाचे हो"" म्हणलो तशी पोरं आम्हाला फसवल्याच्या आनंदात हसू लागले.
जोशी आणि मी देवाच्या पाया पडून जाणार होतो तसेचं चालत आम्ही परीक्षेला जाणार होतो.
आमच्या रूमच्या बाकीच्या पोरांनी ऑटो केला होता.देवाच्या पाया पडून आम्ही srt कॉलेजच्या गेट जवळ धापा टाकत पोहोचतोय तोपर्यंत पोरं आशिक बनाया आपणे हे गाणं वाजवत आले आणि आमच्या सोबत बैठक क्रमांक शोधू लागले.
मराठवाड्यात ऊन जास्त असल्यामुळे सगळे आपल्या आपल्या सोयीने येऊन पेपर देऊन जाऊ लागले. शेवटच्या पेपरला सर्व सरांना भेटण्यासाठी काही मुलं गेली आम्ही पण गेलो.त्यावेळी मात्र थोड्या फार भेटी झाल्या......मग त्याच रात्री बांधलेली बोचकी,पेट्या रद्दी,अर्ध्या किमतीत विकण्यासाठी पुस्तकांचा गठ्ठा असा पसारा घेऊन अंबेजोगाई-परळी मुक्कामी गाडीने गावाकडं परतीचा प्रवास सुरु झाला.तिकिटं काढली की मनातला पहिल्या दिवसापासून कॉलेजमध्ये पहिला दिवस,कॅम्पला आलेली मज्जा,हातचं जेवणं, गावाकडची स्वप्नं, क्षमतेनुसार केलेला अभ्यास व गेलेल्या पेपरची मार्क....प्रियव्यक्तींनी लिहिलेली व हरवलेली वही  (स्लमबुक )
त्यावहिला गावाकडं निवांत वाचायचं म्हणून वाचायचं राहून गेलं शब्द-शब्द न्याहाळायचा होता...ती वही ही हरवली होती...अंबेजोगाई जवळच्या पोरांची गावं आणि तीन std नंबर वगळता माझ्याकडे आठवणींची काहीच शिदोरी शिल्लक नव्हती...
या सगळ्या विचारात आणि प्रवासातील मनाच्या प्रवासाने कधी गाव आलं ते कळलंच नाही.

पाहिले काही दिवस घरात पोरगं अभ्यासानं खराब झालीय हो?
त्याला काही काम सांगू नका हो?
जरा नंदयाला आराम करू द्या....हे थोडे दिवस चाललं....
आणि मग पुन्हा सुरू झाली कामाची वाटणी.....
गाई-म्हशी कोणी दिवसभर राखायच्या ?
बैल आणि नांगर कोण हानायचा ?
कोणाचं आमंत्रण असलं तर कोण जायचं?
आणि बाजारला कोण जायचं ?

अशी छोटी -मोठी काम बारावीच्या मराठीच्या कविता प्रेमाचा गुलकंद वगैरे म्हणून छान काम करू लागलो.निकालाची प्रतीक्षा होती.आणि अखेर तो दिवस उजाडला ४ जून.....

मोबाईलचा एवढा वापर नसल्यामुळे कॉलेजमध्ये लँड लाइन वर एक वाजता फोन करून निकाल मिळवायचा असा प्लॅन होता.पाच सहा रुपये गेले नंबर सांगण्यात अन ओळख पाठवण्यात पुन्हा शिपाई मामा "नंबर सापडलाय नंदू " असं म्हणायला आणि कॉइन संपायला एक झालं.....

शिकायला असताना चार-पाचशे महिन्याला मिळायचे पण आत्ता दहा रुपये सुद्धा विनाकारण मिळत नसतं. पुन्हा घरी जाऊन पाच रुपयांची नोट घेऊन आलो आणि पुन्हा फोन लावला..


शिपाई मामांचा आवाज आला..
"अरे तुला चौर्याहत्तर टक्के पडलेत बाळ"
आणि ते ऐकून थँक्स न म्हणता फोन ठेवला....

संध्याकाळी रामायण महाभारत झाल्यावर सकाळी गेल्यावर्षी ded ला लागलेल्या मुलाची मुलाखत घेतली.गेल्या वर्षीच्या एकोणेंशीला मेरिट क्लोज झाल्याचे कळाले...
..
मार्क शीट आणायला गेल्यावर समजलं प्रसन्न लागला त्याच्या आईने दिलेले दोन-तीन पेढे पण खाऊन आलो.तसेच वर्गातली सतरा मुलं-मुली चाळीस विद्यार्थ्यांपैकी लागल्याचं समजलं.

स्लॅमबुक........भाग १-३

स्लॅमबुक........भाग १-३
*स्लॅमबुक* ✍✍  *GBS*

    मार्च महिन्यात होणाऱ्या बारावी परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक कॉलेजच्या गेट जवळ शिपाई मामांनी बोर्डावर लावले होते.तस परीक्षांचीही तयारी आमची झाली होती..की नाही हे आम्हालाचं माहीत नव्हतं.इंग्रजी सोडलं तर भावा आपल्याला कोणत्या विषयात अडचण नाही असं म्हणणारे आम्ही मराठीच्या सराव परीक्षेला काठावर पास झालो होतो.सगळं काही अभ्यास आणि अभ्यासा संबधी गप्पा, गोष्टी,पाठांतर सुरू असतांनाच हे वेळापत्रक येऊन धडकलं होतं.
वेळापत्रक आणि कोणाचा पेपर कधी?
कोणत्या पेपरला कोणाला किती अभ्यासाला  दिवस मिळणार ? 
ह्या चर्चेला आता उधाण आलं होतं.
मोजून परीक्षेसाठी ४० -४२ दिवस उरले असावेत....?
आणि अश्या वेळी जोशी सरांच्या मुलाने परीक्षेला किती दिवस राहिलेत आणि किती तास,किती मिनिटं हे सगळं काऊंट डाउन सुरू केलं होतं.
पण पोरं फार्मात असल्यावर जोश्या काही बोलायचा नाही ....?


सगळे समवयस्क होतो आणि ज्या जोड्या होत्या त्यात आवडी निवडी आणि त्यांची सांकेतिक नाव ही आम्ही ठेवलेच होते.आणि कुणाला काय नावं ठेवायचे तो विभाग माझ्याकडे होता.एक उदाहरण घ्यायचं म्हंटल तर आमच्या रुमवरचा प्रकाश कावळेला कॉमर्सची पूजा आवडायची.आणि पूजा मामीकडं राहायची म्हणून आम्ही पक्याला मामु म्हणायचं आणि तिला मामी असे सहा -सात जोड्या होत्या.त्यांची प्रकरणं काही पुढची नव्हती पण तुझ्यात जीव गुंतला इथपर्यंत असावीत.
आणि 
सगळं काही अलबेल चालत असताना मामुनं आणि  रम्यानं नवीनचं नाटकं काढली.आम्ही ज्या प्रगती बुक डेपोतुन वह्या,पुस्तकं, दोनवाले बॉल पेन घ्यायचो.त्या दुकानातून साठ रूपायवाली रंगीत संगीत वही आणायची अन विषयाच्या वही सारखी अनुक्रमणिका टाकून त्यात.....
माझं नाव.........?
माझा छंद.........?
माझा जन्म.......?
फोन नंबर आणि सतराशे साठ बाबी अन सर्वात शेवटी महत्वाचा मुद्दा.
.....
तुझ्या बद्दल..   .....?

आणि चार-पाच बऱ्या घरच्या पोरांनी त्या वह्या आणल्या अन त्या वह्या आता फिरू लागल्या,,
झालं का नाही तुझं?
लिहायला किती वेळ लागतो?
आणि हो तुझा घरचा फोन नंबर,पत्ता टाक आणि फोटो पण चिकटवं...
अश्या दोन तीन दिवसांच्या संभाषणानंतर ती वही सॉरी स्लमबुक आमच्या रूमवर यायचे...
ज्याच्यासाठी लिहिलंय त्यानेच वाचायचं?
दुसऱ्यांची स्लमबुक वाचत जाऊ नये?
स्वतःच स्लमबुक देऊन तेच वाचायचं?
असे अनेक प्रश्न आणि शंका ,विरोधाभास असतानाही पोरं होईल त्या अटीवर त्या मुलीनं लिहिलेलं वाचायचे आणि मग वर्गात चर्चा सुरू होईची...
समाज सेवेच्या कॅम्पला नंदया खूप चांगलं गाणं म्हणालास बरका.......
आणि नंदया भगव्या टीशर्टवर खूप जोरात दिसतोस हा?????
असं बोलून दिवसाची सुरुवात व्हायची.......
झक मारली वाटायचं यांना हातच्या चपात्या खाऊ घालून माझी वही वाचायला दिली.

पोरींना पोरांच्या बोलण्याचा अर्थ कळला की वाईट बघायच्या.....
शप्पत 
पण काही फायदा पण नव्हता ?
कारण आपण पण त्यांची दोन वर्षात जाम खेचली होती.


मग मी सगळ्यांची संगत सोडून परीक्षेच्या पुढें काही दिवस जोश्या सोबत राहायचा निर्णय घेतला.आणि राहायला लागलो.गावाकडं अभ्यासाचं आणि परीक्षेचं नियोजन सांगून मेस लावायला सांगितली होती.आणि परीक्षेच्या आधी काही दिवस स्लमबुक प्रकरणापासून जोश्या सोबत अभ्यास जेवण सगळं सुरू झालं....आणि D.ED ला लागायचं म्हणून स्कोअरिंग विषय संस्कृत घेतलेला,तिथं जोष्याची मदत होऊ लागली.आणि तो शेवटच्या दिवसात यार बनला...कारण दोन वर्षात नंदकिशोर म्हणणारं एकच व्यक्तिमत्त्व होतं ते म्हणजे प्रसन्न जोशी त्याचं प्रसन्न हे नावं हे चार-दोन पोरनाचं माहिती होतं,पोरं-पोरी तर सर्रास मला नंदया नाहीतर नंदू असं म्हणायचे.


जोशींची आणि माझी चर्च्या होऊ लागली.की परीक्षेच्या तोंडावर काय ही पोरं स्लमबुक स्लमबुक कारायलेत.

क्रमशः १ कडून २ साठी