भविष्य अंधारात
माझं.................
भविष्य अंधारात
माझं,नोकरी असून उजाड झालंय....
सांगा साहेब आता
तरी,आमच्या पेन्शनचं
काय झालंय?......
तुमच्या सारखं
भविष्य साहेब, आम्हाला बी द्या.......
आमचं दुखणं तुम्हा
कळणार नाही....
रंडक पणाचं दिस, तुमचं कुणी भोगणार नाही.......
आमच्या संगट
पोराचं, जगणं आता ताप झालंय.....
सांगा साहेब आता
तरी,आमच्या पेन्शनचं
काय झालंय.....?....
सामान्य घरातली
पोरं आम्ही अर्धे मजूर अन हाडाचे गुरुजी...
समान काम असूनबी
आम्हा का देता तुम्ही मजुरी.....
हाल पाहवत नाहीत
वहिणींचे
अन काळवंडलेल्या
पोरीचे......
साहेब आम्हालाबी
द्या की पेंशन,
आमची कामं नाहीत
चोरीचे...
खरंच साहेब आमचं
जगणं, स्मशानाहुन घाण झालंय.....
सांगा साहेब आता
तरी,आमच्या पेन्शनचं
काय झालंय?......
१ नोव्हेंबर नंतर
लागलो यात आम्ही काय पाप केलं,
शेती विकून
डी.एड.केलं याचं काय माप झालं,
माय-बापाच्या सपना
पुढी त्या टी.ई.टी.ला बी फिकं केलं...
मेल्यावर काय
सांगू बापाला,
याचं सारं मोजमाप
केलंय...
सांगा साहेब आता
तरी, आमच्या पेन्शनचं
काय झालंय ?......
गुणवत्तेला आम्हीच
तर पाणी घालून मोठं केलं,
गळती असो की
तंत्रज्ञान याला आम्ही छोटं केलं,
परजिल्ह्याच्या
नोकरीनं आयुष्य बी थोटं केलं,
म्हातारपण कसं
जाणार आमचं
तेबी वॉन्टेड
मोस्ट झालंय,
सांगा साहेब आता
तरी, आमच्या पेन्शनचं
काय झालंय?......
संघर्ष करायला
लावू नका नैतिक विचारांनी हैराण केलं,
कमी शिकलेलं
कुंपणचं शेतं सारं खाऊन गेलं,
देऊन टाका की
पेन्शन साहेब, तुमचं कुठं घोडं मेलं,
भविष्याच्या या निर्वाहानं कपातीचं बी वांदं झालंय...
सांगा साहेब आता
तरी,आमच्या पेन्शनचं
काय झालंय?......
आमची
आंदोलनं,मोर्च्रे तुम्हाला मेल्या मड्या समान झालंय,
संघटनां पाठीशी
असताना हि,जगणं आमचं महाग झालंय,
उद्याचा भारत
घडवतोय आम्ही साहेब,
आमचं जगणं एक कर्ज
झालंय....
सांगा साहेब आता
तरी,आमच्या पेन्शनचं
काय झालंय?......
श्री.सूर्यवंशी जी.बी. वाडा(पालघर)
मो-९६०४१८१८८२