निरोप
आज संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्यात गेली १०-१२-१८ वर्ष *तण-मनाने* सेवा केलेले आपले सेवेकरी यांचे साठी ...आठवण ...बऱ्याच वर्षानंतर केलेला हा माझा शब्द प्रपंच.......
*मी न माझा राहिलो*
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
हजर होता शाळेवरती,
घर-दार ही न पाहीलो,
वाड्या-पाड्या वरती माझे मीच नाव कोरीलो..
*मी न माझा राहिलो*
-----------------------------------
माझी शाळा,माझी मुलं,
माझा गाव,माझा वर्ग..
या साऱ्यामध्ये माझे विश्व पाहिलो...
*मी न माझा राहिलो*
-----------------------------------
गर्व माझ्या शाळेचा अन गर्व माझ्या मुलांचा,
अंतरीची ओढ सारी.....
भान हरवुनी चाललो....
*मी न माझा राहिलो*
-----------------------------------
१०-१२ वर्ष गेली,
लहानी मुलं मोठी झाली,
त्यांना (शाहुवाडी) हेच गाव दाविलो.....
*मी न माझा राहिलो*
-----------------------------------
अभिमानाने गृहिणी सांगी,
कौतुकाने मित्र विचारी...
कोल्हापूरी कसे नांदलो?
नांदण्याच्या संगतीला पुन्हा आम्ही सांडलो...
*मी न माझा राहिलो*
-----------------------------------
ठाव ठिकाणा विचारा कधीही,
न कळत येति समरणी ओठी,
(धन) वाड्याची या शान सांगण्या....
कधी न मागे राहिलो...
*मी न माझा राहिलो*
-----------------------------------
पाहिलं प्रेम,पाहिली माया,
इथेच मिळली मातृत्वाची छाया,
अश्रूंना या समजवून,
मीच चिंब जाहलो....
*मी न माझा राहिलो*
-----------------------------------
*रचना - श्री.सुर्यवंशी *GBS* ✍✍✍
🙏🙏🙏🙏🙏