वारणा ज्ञानपीठ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत......

Tuesday, 21 June 2016

MDM-RADIO APP-DCPS FORM

शालेय पोषण आहाराची माहिती भरण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
 नाशिकचे अध्यापक श्री.शेखर ठाकूर यांचे गुरुकुल रेडीओ APPLICATION डाऊनलोड 
करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
अंशदायी पेन्शन असणाऱ्या शिक्षक बांधवांनी EDN नंबर प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या 
अर्जाची प्रत  मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

Monday, 20 June 2016

MDM माहिती भरा.

MDM बाबत सूचना

(महत्वाची सूचना : आम्ही सरल माहिती भरण्यासाठी आपणास मदत मिळावी या हेतूने माहिती पोस्ट करत असतो.या मागे आपले काम वाढवणे अथवा आपणास आदेश देणे असे इतर कोणताही हेतू नाही आहे हे लक्षात घेऊनच पुढील माहिती वाचावी ही विनंती)

समायोजन बाबत

1) खाजगी अनुदानित शाळेतील अतिरिक्त कर्मचाऱ्याचे समायोजन लवकरच सुरु होणार असून त्याबाबतची माहिती सरल मध्ये भरण्याचे काम चालू झालेले आहे याची नोंद घ्यावी.

2)अल्पसंख्याक असणाऱ्या संस्थानी ही माहिती भरत असताना रोष्टर फॉर्म मध्ये माहिती भरावयाची नाही आहे.तो फॉर्म अशा संस्थाना उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आहे त्यामुळे तो फॉर्म वगळता त्यांनी इतर फॉर्म मधील माहिती भरावयाची आहे.

3)काही संस्थानी स्कूल पोर्टल मध्ये माहिती भरताना आपली शाळा चुकून दुसरया संस्थेस जोडली आहे.अशा संस्थांना एक्सेस शिक्षक माहितीचा फॉर्म भरताना शाळांचे नाव अथवा जिल्हा नाव न दिसणे अशा समस्या येत आहे अशा शाळांनी जर आपली शाळा finalized झालेली असेल तर आपली शाळा ज्या लेवल पर्यंत finalized झालेली असेल त्या लेवलशी संपर्क करून सदर माहिती दूरस्थ करावी त्यानंतरच आपणास आपल्या संस्थेच्या समायोजन बाबत माहिती भरता येईल याची नोंद घ्यावी.

4)आपल्या शाळेची कॅटेगिरी कोणती आहे त्यानुसार आपण primary अथवा secondary हे ऑप्शन काळजीपूर्वक निवडावे.जसे की आपली शाळा 5 ते 10 वी असेल तर रोष्टर फॉर्म भरताना आपण 5 वी चा वर्ग आहे म्हणूज प्रायमरी (1 ते 5) क्लीक करून तसे रोष्टर भरू नये.तर अशा केस मध्ये आपण सेकंडरी हा ऑप्शन निवडूनच रोष्टर माहिती भरावी.काही संस्था 5 वी चा वर्ग प्रायमरी मध्ये येतो म्हणून चुकून त्या बाबतची माहिती प्रायमरी मध्ये भरतात.तसे आपण करू नये.5 ते 10 वी शाळेतील 5 वी चा वर्ग जरी प्रायमरी असेल तरी शाळा कॅटेगिरी मात्र सेकंडरी आहेए हे या ठिकानी लक्षात घ्यावे.एकदा भरलेली माहिती पुन्हा delete करता येत नाही याची नोंद घ्यावी.

5)अधिक माहितीसाठी आणि राज्यस्तरीय सरल whatsapp ग्रुप मध्ये सामिल होण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.भेट देण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा.  havelieducation.blogspot.in

शालेय पोषण आहार

1)शालेय पोषण आहार शिजवण्याचे काम जरी बचत गट अथवा इतर कोनत्याही संस्थेस दिलेला असेल तरीही पोषण आहार माहिती भरण्याची जबाबदारी सदर शाळेचीच असेल अशा सूचना प्राप्त झालेल्या आहे.कारण सदर धान्य हे शाळेतच येते आणि त्यानंतर शाळा हे धान्य बचत गट अथवा इतर संस्थेस हे धान्य शिजवण्यासाठी देत असते.सदर धान्य हे पुरवठादार परस्पर बचत गट अथवा संस्थेस देत नाही.तरी पोषण आहार माहिती ही मुख्याध्यापकानेच सरल मध्ये भरावयाची आहे याची नोंद घ्यावी..

2)एखाद्या शाळेने तांदूळ अथवा इतर साहित्य शेजारच्या शाळेकडून उसने घेतले असेल तर सदर मालाची नोंद ही मायनस मध्ये करावयाची आहे.परंतु ज्या शाळेने साहित्य उसने दिले असेल अशा शाळांनी सदर मालाबाबत काय नोंद घ्यायची आहे या बाबत संभ्रम होता.अशा शाळांनी दिलेल्या मालाच्या बाबतीत देखील उसना दिलेल्या साहित्याची वेगळंया स्वरूपात माहितीची नोंद घ्यायची आहे त्यासाठी लवकरच सरल MDM पोर्टल मध्ये सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे याची नोंद घ्यावी.तोपर्यंत आपन साहित्य उसने दिलेले असेल तरी देखील ते कमी करून ओपनिंग बॅलन्स मध्ये नोंद घेऊ नये.ते साहित्य आपल्याकडे आहे असे समजून नोंद घ्यावी.त्यामुळे पुढील सुचनेची वाट पहावी.

3)सध्या आपणास ओपनिंग बॅलन्स भरावयाचा असून हा फॉर्म आपण फक्त एकदाच भरावयाचा आहे.त्यानंतर शाळेत आलेल्या मालाची  त्या त्या वेळी नोंद घ्यायची आहे.तशा नोंदी घेण्याची सुविधा देखील लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.

4)ओपनिंग बॅलन्स भरताना कोणत्या दिनांकाचा भरावा या बाबत संभ्रम निर्माण झाला होता.बऱ्याच शाळानी सुट्टीच्या कालावधी मध्ये देखील पोषण आहार दिला होता तसेच बर्याच शाळा 26 जून ला सुरु होणार आहेत.त्यामुळे सर्वांच्या माहिती मध्ये एकवाक्यता असावी या साठी नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे.opening balance भरताना आपली शाळा 2016-17 या शैक्षणिक वर्षात ज्या दिवशी चालू झालेली असेल त्या पहिल्या दिवशीचा ओपनिंग बॅलन्सची माहिती आता भरायची आहे.सुरवातीला आपण 31 मे अखेरच्या साहित्याची नोंद घेतलेली आहे ती माहिती आता दुरुस्त करून घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.ती माहिती आपण त्वरित दूरस्थ करून घ्यावी ही विनंती.

5) मागील दिवसांची माहिती भरलेली नसेल तर सध्या मागील दिवसांची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.त्यामुळे आपण मागील दिवसांची मुलांची उपस्थिती ही सुविधा बंद होण्याच्या आधी नोंद करून घ्यावी.त्यानंतर आपणास ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही आहे अशा सूचना प्राप्त झाल्या आहे.

6)या शैक्षणिक वर्षात आपल्या शाळेच्या इयत्तेमध्ये वाढ झाली असेल ,उदा., 1 ली ते 4 थी असेल आणि आता 5 वी चा वर्ग वाढला असेल अशा परिस्थितीमध्ये आपणास 5 वी वर्गाची पोषण आहार माहिती भरता येत नाही आहे.कारण नवीन वर्गाची माहिती सरल स्कूल पोर्टल मध्ये अद्याप update झालेली नाही आहे.तरी ही माहिती update करण्याची सुविधा आपणास लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे याची नोंद घ्यावी.

7)काही शाळांना पोषण आहार लागू असूनही त्यांना mdm पोर्टल मध्ये लॉगिन केल्यावर कोणतेही ऑप्शन दिसून येत नाही आहे.अशा केस मध्ये मेनू या बटनावर क्लीक करा.आपनास इतर ऑप्शन दिसून येतील.असए करुणही आपणास इतर ऑप्शन दिसत नसतील तर याचे एक कारण असण्याची शक्यता अशी आहे की सदर शाळेला पोषण आहार सुविधा लागू आहे किंवा नाही या ऑप्शन मध्ये आपल्या शाळेच्या समोर चुकून नाही असे क्लीक झालेले असावे.जेंव्हा आपल्या शाळेच्या mdm लॉगिन मध्ये कोणतेही ऑप्शन दिसत नसेल तेंव्हा ही दुरुस्थी करण्यासाठी mdm च्या ब्लॉक लेवल शी (गटशिक्षणाधिकारी यांच्याशी नाही) संपर्क साधावा आणि ही दुरुस्थी त्वरित करून घ्यावी.त्यानंतरच हे ऑप्शन आपणास दिसून येईल याची नोंद घ्यावी.

8) काही शाळांमध्ये पूरवठादाराकडून फक्त तांदूळ दिला जातो अशा शाळांना mdm पोर्टल मध्ये माहिती भरण्यासाठी फक्त तांदूळ ची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.इतर ऑप्शन त्यांना भरता येणार नाही याची नोंद घ्यावी.
येथे क्लिक करा.

Sunday, 19 June 2016

ठाकुर सरांचे रेडिओ अॅप

अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन
 नाशिकचे अध्यापक ठाकुर सर यांनी शैक्षणिक क्षेत्रातील पहीले 24 तास चालू असणारे रेडिओ अॅप बनवले आहे,  हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी